Share

कोरोना संसर्गाच्या साथीत ऑलिम्पिक स्पर्धेत ‘कंडोम’ वाटपाचा अट्टहास

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी २३ जुलै पासुन जापानमध्ये टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होणार आहे. ८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत सहभाग नोदंवण्यासाठी जगभरातील खेळाडू येणार आहेत. कोरना साथीच्या पार्श्वभूमिवर खेळाडूंच्या सुरक्षिततेची सर्वा उपाययोजना या स्पर्धेदरम्यान केल्या आहेत.

ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर टोकियो येथे खेळाडूंसाठी खास ‘टोकियो अॅथलिट विलेज’ नावांचे गावच तयार केले आहे. या ठिकाणी खेळाडुंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह त्यांना सर्व अत्यावश्यक सेवा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रथेमुळे या स्पर्धेतही दीड लाख कंडोम वाटप करण्यात येणार आहे. एकीकडे जगभरात सुरु असलेल्या कोरोना संसर्गामुळे सामाजीक अंतराबद्दल जनजागृती होत असताना ऑलिम्पिक स्पर्धेत कंडोम वाटप करण्याचा अट्टाहास का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना सामाजीक अंतराचे भान राखुन खेळण्याचे आवाहन केले जात असताना कंडोम वाटपाचा अट्टहास का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोना विषाणुचे संकट ओसरले नसतानाही ऑलिम्पिक स्पर्धा आयोजीत करण्याच्या हट्टामुळे ऑलिम्पिक संघटना आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आणि आता त्यात सामाजीक अंतराबद्दल जनजागृती होत असताना कंडोम वाटपाच्या अट्टहासामुळे वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. १९८८ सालापासुन एचआयव्ही आणि एड्स बद्दल लोकांमध्ये जनजागृतीसाठी ऑलिम्पिक स्पर्धेत कंडोम वाटपाची प्रथा सुरु झालेली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!