मुंबई : जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या शासनाने केले आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. नवीन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू असल्याचे सांगतानाच लोकांचा सहभाग यात दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
तर, शरद पवार यांनी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीची स्तुती केली व मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वालाही दाद दिली. ‘राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सरकार चालवत असताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अबोल असले तरी चतुर आहेत, त्यांनी तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवले आहे. हे सरकार पाच वर्षे जनतेसाठी काम करत राहील, हा मला विश्वास आहे’, असे प्रतिपादन शरद पवार यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या
- कंगनाला दुहेरी झटका; कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमच बंद करा हायकोर्टात याचिका
- अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर
- विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या, आतातरी महाराष्ट्रद्रोही चाळे बंद करा – अनिल देशमुख
- ‘हिंमत असेल तर एकटे लढा’; पराभवानंतर चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला आव्हान
- पुण्याच्या रण’संग्रामा’त भाजपचा दारूण पराभव; महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व


