Share

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे

दरम्यान, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार अॅड किरण सरनाईक 6 हजार 390 मत घेत आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे 5 हजार 383 मतांनी द्वितीय क्रमांकावर तर शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर 5150 मतांनी तृतीय क्रमांकावर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरु आहे.

विशेष म्हणजे  एकाही उमेदवाराने बाद फेरीनंतर प्रक्रिया कोठा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्यात मुख्य लढत आहे.

इकडे पुण्यात अरूण लाड यांना या निवडणुकीत तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत.अरूण लाड यांच्या कार्यकर्तांनी अंतिम निकालाअगोदरच गुललाची उधळण केली होती. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर लाड यांचा विजयी होणार असल्याचं चित्र होतं.

दरम्यान,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

दरम्यान, मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये सतीश चव्हाणांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

दरम्यान,धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरीश पटेल यांनी विजय मिळवला आहे. पटेल यांना ३३२ तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!