Share

देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं – पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत.या हल्ल्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर हल्ले चढवले जाऊ लागले आहेत.देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी केली आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शरद पवार यांनी निषेध केला. तसेच संपूर्ण देश शहीद जवानांच्या परिवारासोबत आहे, असे विश्वासही त्यांनी दिला. ही वेळ राजकारण करण्याची नाही, असे म्हणतानाच त्यांनी सरकारने खबरदारी घेतली की नाही अशी शंका मात्र उपस्थित केली. ट्वीट करून देखील पवार यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!