नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह स्थानिक प्रशासनाने बैठक घेऊन, नाशिकमधील सद्यस्थितीवर मंथन केलं. यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी विरोधकांना चांगलच चांगलच फटकारलं आहे.
करोना संकटाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पवार यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, आतापर्यंत दाखवला तसाच संयम मुस्लिम समाजाने बकरी ईद दिवशी दाखवावा, असे आवाहन पवारांनी केले आहे. मुख्यमंत्र्यानी पूर्णपणे करोनाच्या कामाला वाहून घेतल्याचं सांगत पवारांनी मुख्यमंत्र्याचं कौतुक देखील केलं.
सध्या करोनाचा मोठा प्रभाव, राम मंदिरासाठी वातावरण मंगलमय नाही – हसन मुश्रीफ
“महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर इथे रुग्ण संख्या जास्त आहे. एक महिन्यापूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीमध्ये फरक आहे. मुख्यमंत्री केवळ या एका कामासाठी पूर्णपणे लक्ष घालून आहेत. मुख्यमंत्री त्यांचे काम करत आहेत. मुंबईतील परिस्थिती तुम्ही पाहिली आहे. लवकरच ते नाशिक दौरा करतील” अस शरद पवार म्हणाले आहेत.
तर, आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती बघून त्याची माहिती देणार आहोत. बेडची संख्या वाढली पाहिजे आणि टेस्टिंगदेखील वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विद्यापीठ नाशिकला आहे. इथे डॉक्टर्सची कमतरता असण्याचं कारण नाही. जिल्हा यंत्रणेला डिझास्टर कायद्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांच्या पायाला पुन्हा भिंगरी; नाशिक, सोलापूर नंतर पवारांची स्वारी औरंगाबादला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

