औरंगाबाद : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे राज्याला अडचणीत पाहून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पायाला भिंगरी लावत महाराष्ट्रभर दौरे करत उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. सोलापूर आणि नाशिक नंतर पवारांची स्वारी औरंगाबादला रवाना होत आहे.
कोरोनाने विळखा घातलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे उद्या शनिवार, 25 रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई हे देखील यावेळी उपस्थित असणार आहे.
२१ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात प्रत्येक शनिवार, रविवारी राहणार कडक ‘कर्फ्यु’
देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा दौरा करून तेथील आढावा घेत आहे. संभाजीनगरातील कोरोना बाधितांचा आकडा 12 हजारांवर गेला आहे, तर 426 हून अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाची साखळ तोडण्यासाठी राज्य पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांना यश आले असलेतरी आतापर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा साडेतीन लाखांहून अधिक झाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नुकताच सोलापूर, नाशिक जिल्ह्यांचा दौरा करत तेथील कोरोनाचा आढावा घेतला. आता उद्या शनिवारी ते औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

