अहमदनगर : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने एक बैठक घेतली. या बैठकीत मंदिराच्या भूमीपूजनासाठी ३ आणि ५ ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या.
निश्चित केलेल्या तारखांपैकी ज्या तारखेला पंतप्रधान उपस्थित राहू शकतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा करण्याची योजना ट्रस्टने निश्चित केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्रस्टचा प्रस्ताव मिळाल्यानंतर ५ ऑगस्टला मंजुरी दिली. भूमिपूजनाचा हा कार्यक्रम ३ ते ४ तास चालेल. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी काशीवरून पुजारी बोलवण्यात येणार आहेत. ५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
आनंदाची बातमी : स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरु, दिल्लीतील एम्समध्ये 30 वर्षीय व्यक्तीला पहिला डोस
या भूमीपूजनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं होत.
त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार याचं समर्थन केलं आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तो सर्वांनी मान्य केला आहे. पण सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने परिस्थिती खराब झालेली आहे. वातावरण मंगलमय नाही, आपण एखादे देऊळ बांधतो तेव्हा वातावरण प्रसन्न पाहिजे. मात्र, आज ती परिस्थिती नाही, पवारांनाही तेच म्हणायचे होते, असं म्हणत मुश्रीफ यांनी पवारांचं समर्थन केलं. तसेच, राममंदिर हा अस्मितेचा प्रश्न आहे. त्याला विरोध नाही, फक्त कोणत्या परिस्थितीत कोणतं कार्य केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बरं प्राधान्य कशाला द्यावं हे पवारांनी सांगितलं तेच शंकराचार्यांनीही सांगितलं. त्यांनी राम मंदिराचा मुहूर्त शुभ नसल्याचं म्हटलं आहे, याचीही आठवण मुश्रीफ यांनी करुन दिली.
शरद पवारांच्या पायाला पुन्हा भिंगरी; नाशिक, सोलापूर नंतर पवारांची स्वारी औरंगाबादला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

