Share

मोदींसमोर पवारांनी उपस्थित केला तबलीगींचा मुद्दा; म्हणाले…

Published On: 

मुंबई – भारतासह राज्यातही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली.

या बैठकीत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तबलीगी जमातींचा मुद्दा उपस्थित केला. तबलीगींबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या वार्तांकनाबाबत चिंता पवारांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना पुढे पवार म्हणाले की, ‘हे प्रकरण एवढे वाढवणे योग्य नाही, अशी भूमिका मांडली. दर दिवशी तबलीगीबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे देशातील वातावरण बिघडत आहे, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, असे पवार म्हणाले.

दरम्यान, पवार यांनी मंगळवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना दिल्लीतील तबलीगी प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली होती. ‘दिल्लीत योग्य खबरदारी घेतली असती तर वृत्तवाहिन्यांवरून एखाद्या वर्गाचे वारंवार वेगळे चित्र निर्माण केले गेले नसते. तसेच एखाद्या वर्गाचे असे चित्र निर्माण करून त्यात सांप्रदायिक भर घालण्याची संधी वृत्तवाहिन्यांना मिळाली नसती, असे ते म्हणाले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!