Share

मोठी बातमी : पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा

Published On: 

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम उद्योग, व्यवसाय तसेच शिक्षण क्षेत्रावर पण दिसून आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच आता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा ताण विद्यार्थ्यांवर येऊ नये, त्यांनी कोणतंही दडपण घेऊ नये यासाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक राज्य शैक्षणिक व संशोधक परीक्षक महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

‘कोरोना संकटाच्या काळात आपण १५ जूनपासून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी विविध माध्यमांतून शिक्षणाचे मार्ग आपण सुरू केले आहेत, ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून आपण हे वर्ष सुरु केलं आहे.’ असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!