बुलडाणा : राज्यातच नव्हे तर देशात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी खर्या अर्थाने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची आणि र्शमाची ओखळ करून दिली. भीक नको, हवे घामाचे दाम ही घोषणा त्यांनी जन्माला आणून तमाम शेतकऱ्यांना शेतीप्रश्नावर जागृत केले. शरद जोशींमुळेच शेतकऱ्यांना लढण्याची हिम्मत मिळाली, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बुलडाणा येथे शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अभिनव अर्बनचे संचालक वसंतराव सरदार, गजानन नाईकवाडे, स्वाभिमानीचे पवन देशमुख, शे. रफिक शे. करीम, कडूबा मोरे, दत्तात्रय जेऊघाले, पोखरीचे माजी सरपंच गोकुळ औतकार, हरिभाऊ एकडे, विलास निकम, योगेश सुरडकर, राजेंद्र गीते, श्रीकृष्ण गाढवे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, शेती आणि शेतकरी या विषयासाठी वाहून घेत शेती तोट्यात का जातो, या प्रश्नाचा पिच्छा पुरवताना शरद जोशींनी शेतकरी संघटनेची स्थापना करुन शेतकऱ्यांना लढा तीव्र केला. स्वातंत्र्य चळवळीनंतर सर्वाधिक लोकं तुरुगांत जाण्याचा विक्रम स्व. जोशींच्या नेतृत्वात शेतकरी चळवळीने केला आहे. देशातला शेतीप्रश्न ऐरणीवर आणून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी स्व. शरद जोशींनी आपले आयुष्य खर्ची घातले.
बाजारांत तोबा गर्दी…सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी… टाळेबंदी लागणार का ? वाचा काय आहे प्रकार…
शेतकऱ्यांनात्यांचा हक्क आणि र्शमाचे योग मिळाले पाहीजे, अशी त्यांची भूमिका होती. भीक नको, हवे घामाचे दाम ही घोषणा त्यांनीच जन्माला घातली आणि त्यानुसारच शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळवून देण्यासाठी लढा उभारला. प्रस्थापितांच्या नजरेत नजर भिडवण्याची ताकद त्यांच्यामुळेच मिळाली. इंडिया विरुद्ध भारत अशी मांडणी पहिल्यांदाच शरद जोशींनी केली आणि सातत्याने अन्याय सोसणाऱ्या शेतकऱ्यांनमध्ये उर्जा भरली. लक्ष्मीमुक्तीच्या आंदोलनातून दोन लाख महिलांची नावे सातबारा उताऱ्यावर लावण्याची क्रांती या नेतृत्वाने केली.
पुरग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे लागणार, महाविकास आघाडीतील नेत्याने दिला शब्द
शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांनाचे दारिद्र्य दूर होणार नाही, हे त्यांनी शास्त्रशूद्ध पद्धतीने मांडले. शेतकरी आणि शेतीप्रश्नांवरील अभ्यासाचे ते चालतंबोलतं विद्यापीठ होते, शेतकरी चळवळ स्व. शरद जोशींचे विचार, कार्य आणि योगदान कधीच विसरु शकत नाही, त्यांच्या विचारांचा वारसा ताकदीने पुढे नेऊ, असे प्रतिपादन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

