Share

पुरग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे लागणार, महाविकास आघाडीतील नेत्याने दिला शब्द

Published On: 

भंडारा : प्रफुल्ल पटेल यांनी काल भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. शेतांमध्ये जाऊन पिकांचे झालेले नुकसान त्यांनी पाहिले. शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पूरपरिस्थितीसोबत निपटताना अन्न धान्य, निवारा यांसह गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. हे सर्व प्राधान्याने सोडवावे लागणार आहेत. यासाठी राज्य सरकारमधील सर्व मंत्री कामाला लागले आहे. सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही आहोत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल, यासाठी आमचे सर्व प्रयत्न असणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस रौद्र रुप धारण करीत आहे.

पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी या जिल्ह्याचे ‘राजे’ पोहचले थेट बांधावर

या परिस्थितीची दोन हात करताना शासनावरील आर्थिक संकट घोंगावते आहे. पण अशाही स्थितीत पुरामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत मदतीसाठी जे काही निकष होते. त्यापेक्षा जास्तच मदत यावेळी शासनाकडून नुकसानग्रस्तांना होणार असल्याचेही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.

कोरोनामुक्त होण्यासाठी धारावी व कोळीवाडा पॅटर्नचा नागपुरकरांना होणार असा फायदा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!