🕒 1 min read
मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर महिन्याभरात बीसीसीआयने या स्पर्धेच्या उर्वरित हंगामाची घोषणा केली. मात्र याच कालावधीत अनेक आंतरराष्ट्रीय संघाचे वेळापत्रक व्यस्त असल्याने विदेशी खेळाडु आयपीएलमध्ये खेळु शकणार नाहीत.
यादरम्यान आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची पुर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यातुन अनेक प्रमुख खेळाडुंनी आयपीएलमुळे माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे. यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियात वाद सुरु आहे. आता या वादात ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटु शेन वॉर्नने उडी घेतली आहे. राष्ट्रीय संघापेक्षा आयपीएलला महत्व देणाऱ्या खेळाडूंना देशाकडुन खेळण्यास संधी देऊ नये असे तो म्हणाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले.
पैसे कमवण्यासाठी आयपीएल ही नक्कीच एक उत्तम संधी आहे. मात्र जेव्हा देशाकडुन खेळण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही आयपीएलला प्राधान्या देत असाल तर अशा खेळाडूंना राष्ट्रीय संघात निवडु नये. यामुळे अनेक खेळाडू विश्रांतीची सबब पुढे करुन कसोटी क्रिकेटला नकार देतील. आणि केवळ पैशामुळे ते देशाकडुन खेळण्याची एक संधी गमावतील. यावेळी त्याने कसोटी क्रिकेटचे महत्वही पटवून दिले आहे. शेन वॉर्नने आयपीएलच्या पहिल्या हंगामातील जेतेपद पटकावले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक आजाराचे आपण औषध नाही पण प्रयत्न करून प्रश्न सोडवा’ ; पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी-फडणवीसच ; कॉंग्रेसचा घणाघात
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
