नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरात दीड वर्षाच्या अवधीनंतर शुक्रवारपासून 4जी इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. ऊर्जा आणि माहितीचे प्रधान सचिव रोहित कंसल यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीरमध्ये 4जी मोबाइल इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. 5 ऑगस्ट 2019 पासून जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने इंटरनेट बंदीचा निर्णय घेतला होता. यामुळे आता राज्यात एकूण 550 दिवसानंतर 4G मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत झाली असे म्हणावे लागेल.
4 जी सेवा सुरू होताच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलंय की, 4 जी मुबारक! ऑगस्ट 2019 नंतर प्रथमच संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये 4 जी मोबाइल डेटा मिळेल. देर आए दुरुस्त आए.
4G Mubarak! For the first time since Aug 2019 all of J&K will have 4G mobile data. Better late than never.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 5, 2021
दरम्यान, येथील 2 जी इंटरनेट सेवा मात्र जानेवारी 2020 मध्येच पूर्ववत करण्यात आली होती. राज्यात 4 जी मोबाइल इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. नुकतेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात 4 जी सेवेवरून लक्ष्य केले होते.
ते म्हणाले होते की, पंतप्रधान भारतात 5 जी इंटरनेट सेवेबद्दल बोलत आहेत, पण जम्मू-काश्मीरमधील लोकांना 4 जीसुद्धा उपलब्ध करून दिले जात नाहीये. पंतप्रधान जर जम्मू-काश्मीरात येऊन राहिले तर त्यांना कळेल की, टूजीमुळे लोकांचे किती हाल झाले.
महत्वाच्या बातम्या
- अंबाजोगाईच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची निवड
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

