🕒 1 min read
मुंबई : ईडीने राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये. आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे सरकार आणि आमदार कोणाला शरण जाणार नाही. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईविरोधात दिली होती.
सरनाईक हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ता असून ते शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजप ईडी सारख्या संस्थांचा वापर करुन भाजपविरोधात बोलणाऱ्या नेत्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय.
यावरच संजय राऊत यांनी ट्विट करून भाजपला टोला लगावला आहे. सरनाईक यांच्या संदर्भात ईडीने केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. यांवरच संजय राऊत यांनी ट्विट करत सिबीआय आणि ईडी असे दोन चित्र दाखवत लिहिले आहे कि, ‘रुक! अभी तय नहीं हुआ हैं, किसके घर जाना हैं ‘असा टोला संजय राऊतांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2020
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी पुण्यात येणार मात्र ‘छोटे भाई’ उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित !
- प्रताप सरनाईक यांच्या ईडी कारवाईवर, सचिन सावंत यांचा फडणवीसांना थेट सवाल
- वुहानचा व्हायरस त्याला भारी पडणार ‘पुनावाला सायरस’, पवारांच्या वर्गमित्राची सिरम !
- ‘जी भांडी मोकळी असतात ती फार वाजतात, भरलेलं भांडं कधी वाजत नाही’, सुप्रिया सुळेंचा भाजप नेत्यांना टोला
- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

