पुणे : शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे. त्यानंतरही शिवसेनेचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या विरोधात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे देखील सभा घेत आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. अशीच एक सभा आज सासवड भागात सुरु आहे. या सभेत सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जबरदस्त डायलॉगबाजी करत त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर टीका केली. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला आहे.
पुण्यातील सासवड भागात शिंदे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या सभेचे आयोजन केले होते. यावेळी भाषण करताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “अंतकरणापासून सांगतो आतापर्यंत जर कुठलं नेतृत्व खरचं पटलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांचं. त्यामुळे आम्हाला शिंदे यांचे विचार घराघरात पोहचवायचे आहेत. तेव्हा आमची कामं होत नव्हती, मग आम्ही काय करायचं? कुठे जाऊन कामं करायची? कर्नाटकात का? या राष्ट्रवादीने राज्याची तिजोरी गिळून टाकली, पण आम्ही काही मेलेल्या आईच दूध पिलेलो नाही, आम्ही पण ठोका देणारच”, असा इशाराच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीला दिला.
तसेच पुढे शहाजीबापू पाटील असेही म्हणाले कि, “निवडणुका झाल्यानंतर आम्हाला वाटलेलं कि सेना भाजपच्या युतीचं सरकार येईल. मात्र तुम्हीच आम्हाला फरफटत नेऊन राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं. आम्ही विधानपरिषदेतून एक एक करून गेलो. कधी न कसे गेलो एकालाही कळलं नाही. सगळे म्हणाले शिंदे साहेब आम्हाला घेऊन गेले. पण तसं नाही, आम्ही शिंदे यांना पुढे घालून घेऊन गेलो. आम्ही जे काही केलं ते फक्त शिवसेना वाचवण्यासाठी केलं.बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांची शिवसेना, त्यांचे विचार, त्यांची भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही ते केलं. स्व. यशवंत चव्हाण यांच्यानंतर लाभलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत.”
महत्वाच्या बातम्या:
- Alia bhatt | “मी ब्रा का लपवायची?…”; आलिया भट्टच बोल्ड विधान
- Ajit Pawar |”राज्याचे प्रमुख नियम तोडतात, त्यांनी…” ; अजित पवारांचा मुख्यमंत्र्याना टोला
- Ajit Pawar | शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवारांची मिश्किल टीका! म्हणाले…
- Shahjibapu Patil । आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?, शहाजी बापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल
- Uday Samant | “जनता मुख्यमंत्र्यांना समर्थन देते त्यामुळे…” ; उदय सामंत यांची प्रतिक्रिया!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

