Share

लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र उभारा, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कृषी विभागाला सूचना

Published On: 

लातूर : लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची पेरणी, उत्पादन, बाजारपेठ व त्यावर आधारीत येथे उभारलेले गेलेले उदयोग लक्षात घेता येथील कृषी महाविदयालय परीसरात सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्याच्यादृष्टीने निर्णय घ्यावा, अशी सुचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर भेटीवर आलेले राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना केली आहे.

लातूर भेटीवर असलेले कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शनिवार अमित देशमुख यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी लातूर जिल्हयातील कृषी उत्पादन, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, जिल्ह्यातील हवामान येथे राबवायचे कृषी प्रकल्प, कृषी महाविदयालय, गळीत धान्य संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, पशुधन या संदर्भाने सविस्तर चर्चा झाली.

सध्या पेरणीचे दिवस लक्षात घेता बियाणे व खताचा पूरवठा सुरळीत व्हावा, मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना थकीत वीमा भरपाई मिळवून दयावी. पात्र लाभधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देणाऱ्या वीमा कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे. लातूर जिल्ह्यात आवश्यकतेनुसार महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून दयावे. नुकसान भरपाई न देणाऱ्या बियाणे कंपन्यावरही कार्यवाही करावी. लातूर जिल्हयाची कृषी उत्पादकता लक्षात घेता येथे फुडपार्क उभारण्याच्यादृष्टीने प्रस्ताव तयार करावा. जिल्हयात डाळवर्गीय कृषी उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी, अशा सुचनाही कृषी सचिव डवले यांना केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!