तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेची मुख्यमुळ मुर्ती सुर्यग्रहण काळात शुभ्रवस्ञासह देविच्या मुख्य गाभाऱ्यात तील चांदीचा सिहासनात सोवळ्यात ठेवण्यात आली होती. रविवार दि21रोजी असणाऱ्या कंकणाकृती सुर्यग्रहण पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेचे धार्मिक विधी पुर्वपरंपरे संपन्न झाले.
कोरोनाने मृत्यु झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान
रविवार दि 21रोजी पहाटे 4.30वा श्रीतुळजाभवानी मंदीराचा मुख्य निंबाळकर दरवाजा उघडण्यात आला. नंतर पहाटे 5.ते5.15 वा चरणतिर्थ करण्यात आले. नंतर सकाळी सहा वाजता श्रीतुळजाभवानी देवीस दहीदुधपंचामृतअभिषेक व पुजा करण्यात आल्या. नंतर आरती व दुपारती करण्यात आली.
कापूस आणि सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा – लोणीकर
नंतर 9.50वा पुजेची घाट करण्यात करण्यात आल्यानंतर पुजारी देवीजवळ आल्यावर निर्माल्य विसर्जन करण्यात आले.नंतर ,श्रीतुळजाभवानी मातेस 10.8 वाजल्या पासुन सोवळ्यात ठेवण्यात आले.01.37 वा नंतर ग्रहण काळ संपल्यानंतर देवीस पंचामृत स्नान घालण्यात येवुन वस्ञोलंकार घालण्यात आल्यानंतर आरती धुपारती करण्यात आली.
सुर्यग्रहणानंतर महाद्वारातून नागरिकांनी देवीदर्शन !
कोरोना पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीरात भाविकांना प्रवेश बंद असल्याने भाविकांनी घरीच स्नान करुन राजमाता जिजाऊ महाद्वारातून समोर येवुन कळस दर्शन घेतले. नंतर गोरगरीबांना यथा शक्ति दान करुन पुण्यपदरी घेण्याचा प्रयत्न केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

