Share

पती सीमेवर करत आहे देशसेवा, पत्नी झाली तहसीलदार

Published On: 

बुलढाणा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

‘मुख्यमंत्री म्हणतात घरात बसा तर भुजबळ म्हणतात घराबाहेर पडा’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३,६०,९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यातून मुख्य परीक्षेकरता ६,८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.

दरम्यान या सगळ्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि वेगळं काही तरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या इंद्रायणी गोमासे यांना मोठं यश संपादन केलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन इंद्रायणी यांनी आता तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.

शिकून काय करायचं, घरचं तर सांभाळावं लागतं, हा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोण आहे. पण लग्न झाल्यावरही इंद्रायणी यांनी शिक्षण पूर्ण करून यशाचं शिखर गाठलं आहे. वडिलांकडे फक्त तीन एकर जमीन. त्यात तीन बहिणी आणि एका भावाच्या शिक्षणाचं ओझं, मात्र इंद्रायणी यांच्या वडिलांनी मुलींचं शिक्षण थांबवलं नाही. शेती पिकवून त्यांनी मुलींचं शिक्षण व लग्न केले.

इंद्रायणी यांच्या लग्नानंतर पती सीआरपीएफमध्ये दाखल झाले. ते सध्या छतीसगड येथील बस्तर येथे देशाची सेवा करत आहेत. बाकी परिवार शेतकरी असल्यावरही, सासरच्यांनी त्यांचा शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरूच ठेवलं. याच फलित म्हणजे इंद्रायणी यांनी कृषी पदविकेत 10 पुरस्कार पटकावले. यात 5 सूवर्ण, 2 रजत तर 3 रोख पुरस्कार आहेत.

कोरोनाने मृत्यु झाल्यास महावितरण कर्मचाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान

कृषी पदवी मिळवून शासकीय कार्यलयात नोकरी मिळवली. तर शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचू शकतील, नाही तर शेतीवर अनेक संशोधन केली जातात. पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. या करता एवढ्यावरच न थांबता इंद्रायणी यांनी स्पर्धा परीक्षेचा पुणे येथून खासगी शिकवण्यातून स्वतः अभ्यास करून राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण होऊन ओबीसी या प्रवर्गातून मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावून आता त्या तहसीलदार झाल्या आहेत.

इंद्रायणी यांनी या यशाचं श्रेय त्यांनी त्यांचे आईवडील, पती व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दिलं आहे. इच्छाशक्ती व परिश्रम करण्याची जिद्द असली की सर्व शक्य आहे, हे इंद्रायणी यांनी दाखवून दिलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!