Share

सेना-भाजप आमदारांमध्ये हातघाई, विधानसभेत तुफान राडा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत करावी अशी मागणी केली आहे. तर आजही भाजप आमदारांनी पोस्टरबाजी करत घोषणाबाजी केली. तर भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेना आमदार यांच्यात कामकाज सुरु असतानाचं हातघाई झाली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आणि नुकसान भरपाईच्या मुद्यावरून विरोधकांनी वेलमध्ये उतर आंदोलनाला सुरवात केली. यावेळी प्रचंड गदारोळ झाला. त्याचवेळी भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेना आमदार यांच्यात हातघाई झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते जयंत पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून मोठा अनर्थ वेळीच टाळला.

दरम्यान उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याचीच आठवण भाजपने करुन देताना, ‘सामना’च्या बातमीच कात्रण पोस्टररुपात झळकावून, जोरदार घोषणाबाजी केली. काल विरोधकांनी सावरकरांचा मुद्दा उचलून धरला होता. तर आज शेतकऱ्यांच्या मदतीवरूनही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली होती, मग आता तेच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना 25 हजाराची मागणी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनी केली. पुरवणी मागण्यांमध्ये हेक्टरी 25 हजार रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकारची भावना नाही, असा आरोप फडणवीसांनी केला.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1206810656067837957?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206810473716305920?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206801387545194496?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!