🕒 1 min read
मुंबई : शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यावर सलमान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार एकत्र आल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेव्हापासून याची चर्चा सुरू झाली आहे.
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते एकत्र येण्यामागचं कारण काय होतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एक फोटो समोर आला आहे. सौदी अरेबियाच्या ‘रेड सी फिल्म’ फेस्टिव्हलचे अध्यक्ष मोहम्मद अल तुर्की आणि अनेक पाहुणे भारतात आले होते. आणि त्यांचे स्वागत शाहरुख खाननं ‘मन्नत’मध्ये बोलून केलं. याच कारणामुळे सलमान, सैफ आणि अक्षय ‘किंग खान’च्या घरी गेले होते.
अल-उलासच्या रॉयल कमिशनचे सांस्कृतिक मंत्री आणि गव्हर्नर बद्र बिन फरहान अलसौद यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते शाहरुख खान, सैफ अली खान, सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत भेटताना दिसत आहेत. ‘बॉलिवुड सुपरस्टार्स सैफ, शाहरुख, अक्षय आणि सलमान खान यांना भेटलो. चित्रपट जगताबद्दल बोलण्याची आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळाली’, असं कॅप्शन फोटोंना देण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
“उफ्फ! हृतिक रोशनचा ‘वेधा’ लुक पाहून गर्लफ्रेंड सबा म्हणाली…
“मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे लागतील” – राज ठाकरे
“छळ करून कोणी दहशतवादी होत नाही..” विवेक अग्निहोत्रींचा व्हिडिओ व्हायरल
IPL 2022: गुजरात सोबतची कामगिरी बघता हार्दिकची लागू शकते लॉट्री! T20 WCसाठी मार्ग मोकळा
“तुम्ही मध्यस्थी करा मुख्यमंत्र्यांना समजावा…” – फडणवीसांची अशोक चव्हाणांना विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
