नवी दिल्ली : मागील काही दिवसां पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने उच्चांकी दर गाठला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ झाली आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर देखील होत असल्याचे दिसत आहे. घरगुती गॅसच्या किमती देखील वाढल्या. तसेच तेल, भाजीपाला यांचे दर देखील वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
आज जारी केलेल्या दरानुसार, मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77 रुपये तर डिझेल 102.52 रुपये प्रती लीटरपर्यंत पोहचले आहे. दिल्लीत पेट्रोल 105.84 आणि डिझेल 94.57 रुपये दर इतका आहे. इंधनाचे दर सर्वाधिक मुंबईत असून काही दिवसातच हे दर 120 रुपये प्रती लीटर होईल यात काही शंका नाही.
दरम्यान, सततच्या वाढत्या किमतीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती आधीच शंभरी पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलने देखील काही भागात शंभरी गाठली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार


