मुंबई : काही दिवसांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. या नवीन वर्षाकडून सगळ्यांच्याच नवनवीन अपेक्षा आहेत. 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठीच संकाटाचं, निराशेचं ठरलं. कोरोना, लॉकडाऊन, बेरोजगारी यामुळे अनेकजण निराश झाले आहेत.
बॉलीवूडसाठी देखील २०२० हे वर्ष फारकही चांगल ठरल नाही. बॉलिवूडनेही यंदा अनेक धक्के पचवले. 2020 सारखं वर्ष पुन्हा येऊ नये अशी इच्छा सर्वांचीच आहे. अगदी बिग बी अमिताभ बच्चन यांनाही तेच वाटतं. त्यामुळे त्यांनी चक्क नव्या वर्षाची दृष्ट काढली आहे.
सध्या 2021 या वर्षाची काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यापैकी एक मीम बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे. या मीममध्ये 2021 असं लिहीलेला एक फोटो अमिताभने शेअर केले आहे. त्यात खाली लिंबू आणि मिरची लटकलेली दिसत आहे. अमिताभ यांनी या मीमवर ‘कृपा कृपा कृपा’ या कॅप्शन लिहिलं आहे.
T 3752 – कृपा कृपा कृपा !! ???? pic.twitter.com/3Zws6QcVrQ
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 14, 2020
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही : गडकरी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने- दरेकर
- मोदी सरकारसाठी शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी तर भांडवलदार हे उत्तम मित्र- राहुल गांधी


