Share

IPL 2022 : रैनाची एन्ट्री पक्की? वाचा गुजरात टायटन्स संघानं दिलेलं उत्तर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गुजरात लायन्सच्या संघातून जेसन रॉयने माघार घेतल्यानंतर सुरेश रैना भाग बनणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. चाहत्यांनी तर त्याचे गुजरात मधल्या जर्सीत फोटोही एडिट करायला सुरुवात केली होती. आता या सर्व प्रकरणावर गुजरात टायटन्स जवळच्या सूत्राने माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी “त्याला रॉयची रिप्लेसमेंट म्हणून संघात घेण्याचा कधी विचारही केला नव्हता” असे स्पष्ट सांगितले आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना (suresh raina) IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये विकला गेला नव्हता. चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्याला रिटेन केले नाही आणि ऑक्शनमध्ये त्याला विकत घेण्यात रसही दाखवला नाही. ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या, रैनाला किमान त्याच्या मूळ किमतीनुसार संघात निवडले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही आणि तो विकला गेला नाही. जेसन रॉयच्या (jason roy) जागी तो खेळेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती मात्र ती आता संपुष्टात आलेली दिसत आहे.

गुजरात टायटन्स (gujrat titans) मेगा ऑक्शनमध्ये इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला खरेदी केले होते. मात्र त्याने बायो बबलच्या थकवामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे असे सांगत आयपीएल मधून बाहेर पडायचा निर्णय घेतला. तसेच तो क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेणार आहे असेही सांगितले. यावर्षी नव्याने स्पर्धेत जोडल्या गेलेल्या गुजरात टायटन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. IPL 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी गुजरातने त्याला १५ कोटी रुपयांना संघात घेतले होते. याशिवाय, रशीद खान आणि शुभमन गिल यांनाही मेगा ऑक्शनपूर्वच गुजरातमध्ये आणण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!