🕒 1 min read
सांगली : गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढत होत आहे. गुरुवारी सकाळी सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २०.६ फुटावर पोहोचली. एका रात्रीत तब्बल पाच फुटांपेक्षा अधिक पाणी वाढल्याने पूर्व पट्ट्यातील तसेच नदीकाठावरील वस्त्यांमधील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा महापुराच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी रात्री नऊ फुटांवरील पाणीपातळी १५.६ फुटांवर गेली होती. धरण क्षेत्र तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने रात्रभर पाणीपातळी झपाट्याने वाढत गेली. सकाळी आठच्या सुमारास अरुण पुलाजवळ २०.६ फुटांवर पाणी पोहोचले होते. सांगलीत ३४ फुटाला सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉटमध्ये पाणी शिरते. तसेच पस्तीस फुटाला रस्त्यावर पाणी पोहोचून मार्ग बंद होतो.
आनंदाची बातमी : लसीचा पुरवठा करण्यासाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेकचा सिरम सोबत करार
दत्तनगर, काकानगर तसेच मगरमच्छ कॉलनीतही छत्तीस- सदतीस फुटाला पाणी पोहोचते. एकूणच पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा गेल्या वर्षीप्रमाणे महापुराची धास्ती लागून राहिली आहे. त्यामुळे महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाने पुरपट्टा तसेच नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यादृष्टीने नागरिकांनाही जीवनोपयोगी साहित्याची सावरासावर करण्याची सूचना दिली आहे.
‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे म्हणजे आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
