Share

वाह रे पठ्यांनो !भाजपच्या नेत्यांनी मटणावर ताव मारून केले श्रीराम पूजन;जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या

Published On: 

धुळे – हिंदू धर्मीयांचा पवित्र महिना म्हणून श्रावण महिन्याची जगभरात ओळख आहे. श्रावण महिन्यात हिंदू धर्मीय बांधव मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करतात. तसेच बुधवारी संपूर्ण देशभरात श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव सुरू होता हा आनंद उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत असताना दुसरीकडे धुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मटणावर ताव मारत होते या मंडळींनी चक्क तीन बोकडाचे मटण फस्त करून तृप्तीचे ढेकर दिल्यानंतर श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करत जयघोष केला.

एकीकडे श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी हा दिवस प्रभू श्रीरामांच्या स्मरणात व्यतीत करण्याचा आणि मंगल दिनी रांगोळ्या काढून गुढ्या उभारून आनंद उत्सव साजरा करण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात येत असताना दुसरीकडे धुळे जिल्हा परिषदेचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पार्टीत रंगल्याचे चित्र पहायला मिळालं.

dhule bjp mutton party

त्याला कारणही तसंच आहे. गोदुर गावाजवळ साई लक्ष्मी लॉन्स येथे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मटणाचे जेवण ठेवण्यात आले होते. मात्र या लॉनच्या संचालकांनी आज अयोध्या येथे श्री राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम असल्याने तसेच श्रावण मासानिमित्त आपण मटणाचे जेवण करू देत नसल्याचे सांगितले.

यामुळे या लॉंसच्या प्रवेशद्वारा लागत असलेल्या शेतातील झोपडीत जिल्हा परिषद सदस्यांनी मटणावर ताव मारला विशेष म्हणजे सदस्यांसह अधिकारी आणि त्यांची मुले नातेवाईक आणि पती अशा सुमारे दीडशे जणांनी ३ बोकडाचे मटण फस्त केल्याची माहिती एका सदस्याने दिली या मटनाच्या पार्टीनंतर सर्वसाधारण सभा पार पडली मात्र ‘ आधी पोटोबा,मग विठोबा ‘ या उक्तीप्रमाणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामांचा जयघोष करीत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला.

एकीकडे राम मंदिराचे निर्माण हा भाजपाच्या अजेंड्यावर मुख्य आणि प्रतिष्ठेचा मुद्दा असताना तसेच राममंदिरासाठी अनेक वीरांनी आपलं आयुष्य अर्पण केलेलं असताना राममंदिरासाठी झालेल्या आंदोलनात समर्पण त्याग संघर्ष याचा संकल्प करण्यात आला होता. ज्यांच्या त्याग बलिदान आणि संघर्षामुळे हे स्वप्न साकार झाले त्या सगळ्यांना संपूर्ण भारत देश वंदन करत होता मात्र दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अश्या पद्धतीने पार्टी केल्याने हा टिकेचा विषय ठरला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!