🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतल्या वक्तव्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. तसेच याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहे. राहुल गांधी यांच्यावर सर्व क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
याचप्रमाणे विरोधकांनी तर महाविकास आघाडीला चांगलेच धारेवर धरले आहे. राहुल गांधी यांच्या दिल्लीतल्या वक्तव्याचे पडसाद आजच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे सावरकर प्रेम म्हणजे ढोंगीपणा आहे, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘साडेपाच वर्षे मोदींचे सरकार केंद्रात आहे. सावरकरांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी आम्ही केंद्राकडे करत आहोत मग आतापर्यंत का दिला नाही, असा सवाल राऊत यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
दरम्यान, ‘राज्यातील आघाडीचे सरकार कार्यकाल पूर्ण करेल. एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर काय बोलते यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून नाही, राज्यातील सरकार आणि सावरकर हे स्वतंत्र विषय आहेत, असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206455615083565057?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206453769422008320?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
