🕒 1 min read
मुंबई : काल संध्याकाळी शिवसेना नेते अनिल परब, कॉंग्रेस नेते अमित देशमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नबाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत एका बंद लिफाफ्यात १२ नावं सादर केली. त्यामुळे राज्यपालनियुक्त आमदारांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार यावरून निर्माण झालेली उत्सुकता अखेर संपली आणि नावे समोर आली.
कॉंग्रेस तर्फे सचिन सावंत,रजनी पाटील,मुजफ्फर हुसेन,अनिरुद्ध वनकर ही चार नावं निश्चित करण्यात आली. मात्र, विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या 12 नावांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना डावलण्यात आल्यानंतर त्यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर ‘श्रद्धा और सबुरी’ असं ट्वीट केलं आहे. या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्या जागेवरुन वाद सुरु होता तेव्हाही सत्यजीत तांबे यांनी हेच ट्वीट केलं होतं.
श्रध्दा और सबुरी !
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) November 6, 2020
राज्यपाल कोणाची नियुक्ती करू शकतात?
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.पण बऱ्याच वेळेस राजकीय पुनर्वसनासाठी या नियुक्त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे आता, महाविकास आघाडीने १२ नावे राज्यपालांकडे सोपवल्यानंतर ते आक्षेप घेणार का? याकडं राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे
- राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषित केलेली मदत पुरेशी नाही; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- ‘माझे डोळे परत द्या…मी त्या नराधमांना ओळखेन…शिरुरमधील पिडित महिलेची आर्त विनवणी’
- मुख्यमंत्री वेळ देत नाहीत म्हणून शिवसेना नेत्यानेच घेतली राज्यपालांची भेट !
- सचिन सावंत यांना तज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

