🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाबरोबरच अनेक राष्ट्रीय महामार्गांचे कामे सुरू आहेत. त्यातच नारायणगाव बायपास पुणे-नाशिक महामार्गाचे काम देखील सुरु होत. आता ते पूर्ण झाले आहे. याबद्दल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून माहिती दिली. पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार झाला असून त्याचे फोटो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट केले आहेत.
पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावातून हा रस्ता जाणारा हा बायपास, पुणे-नाशिक प्रवास अधिक सुखकर करेल असं नितीन गडकरींनी म्हटलंय. तसंच आता या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातली उत्पादनंही वेगानं मुंबई- पुण्याच्या बाजारपेठांमध्ये सहज पोहोचतील असंही गडकरींनी ट्वीटमध्ये नमूद केलंय. दरम्यान, गडकरींनी मांडलेल्या या मुद्द्यावरून काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी टीका केली आहे.
Thank u for updating on project approved in 2013 during congress regime.
???? few more bypasses on this road are pending
???? work is incomplete at many places
???? quality of work is pathetic
???? ghat sections are facing landslide incidents
???? contractor has ran away due to bankruptcy https://t.co/NyVTrwHehd— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 17, 2021
नारायणगाव ते पुणे महामार्ग रस्त्यावरील उजवीकडचे काम हे बऱ्याचपैकी बाकी आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण महामार्गाचे काम हे अपूर्ण आहे. मुंबई-पुणे महामार्गवरील उजव्या बाजूचे बरेच काम बाकी आहे. घाटातून प्रवास करताना कोणतीही सुरक्षा दिसुन येत नाही. कंत्राटदाराने रस्त्याचे दिवाळंच काढून पळ काढला आहे अशी टीका तांबे यांनी केली आहे.
नेमका कसा आहे नारायणगाव बाह्यवळण मार्ग?
पाच वर्षांपूर्वी पुणे-नाशिक महामार्ग नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच खेड ते सिन्नरदरम्यानच्या नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचे काम २०१६ ला सुरू झाले. सुमारे पाच किलोमीटर लांब आणि साठ मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम २०१८ मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले होते. त्यानंतर आता या बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झालेय. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होऊन पुण्यातून थेट नाशिक आणि मुंबईला पोहोचणे आता सहजशक्य होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचे राजकीय फलित काय?
- पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार, नितीन गडकरींनी दिली माहिती
- ‘मूठभर उद्योजकांची सौरऊर्जा प्रकल्पावर मक्तेदारी’, आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा
- व्यवस्थेला जेरीस आणू, पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही-विजय वडेट्टीवार
- मोदींच्या भेटीबाबत खुद्द शरद पवारांनी केला खुलासा, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

