Share

फक्त बॉलीवूड सेलिब्रेटी आणि काही कॉर्पोरेट्सकडून मोदीजींच्या भाषणाचे कौतुक – तांबे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  देशातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशाला संबोधित केलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जागतिक महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोना पासून दूर राहण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी देशातील १३० करोड लोकांचा येत्या काही कालावधीचा वेळ मागितला आहे. खूप गरजेच असेल तरच घर बाहेर पडा. घरूनच काम करावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

विज्ञानाकडे सध्याच्या कोरोना व्हायरसवर इलाज नाही. त्यामुळे काळजी घेणच क्रमप्राप्त आहे. तसेच वयोवृद्ध व्यातिनी घर बाहेर पडू नये असाही आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं आहे. सोशल डीस्टनसिंग पाळाव असंही त्यांनी आवाहन केलं आहे.

रविवारी लागणार देशात जनता कर्फ्यू

जनतेद्वारे जनतेसाठी कर्फ्यू अशी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू मागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत देशातील जनता घरात राहूनच यात सहभागी होईल. तसेच घर बाहेर न पडणे हा या जनता कर्फ्यूचा मुख्य हेतू आहे. आपल्याला कोरोना महामारीला हरवायचं आहे म्हणून कोणीही बाहेर पडू नये. अत्यआवश्यक सुविधा यातून वगळण्यात आले आहे. तसेच या उपक्रमातील अनुभव आपल्याला महामारीशी लढायला पुढे उपयोगी पडेल असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी रविवार आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता सर्वांनी आपल्या घरात खिडकी, दरवाजा बाल्कनी इथे उभेराहून कोरोनावर मात करण्यासाठी लढणाऱ्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक करावी. यासाठी आपण टाळ्या, थाळ्या आणि घंट्या वाजवून त्यांचे आभार मानले पाहिजे असे मोदींनी देशाला आवाहन केलं आहे.

सत्यजित तांबे यांची टीका –

आता युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात ठोस काही नसल्याचं सूचित केलाय ते ट्विटर वर लिहतात, मला फक्त बॉलीवूड मधील काही सेलिब्रेटी आणि काही कॉर्पोरेट्स मोदीजींच्या आजच्या भाषणाचे कौतुक करताना दिसत आहेत. तसेच उपाय योजना करायला दिरंगाई झाली असून आताही प्रयत्न तोकडे आहेत असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कोरोनामुळे येऊ घातलेल्या आर्थिक संकटांशी लढण्यासाठी कुठलीही भारिव तरतूद नसल्याच म्हणत सत्यजित तांबे यांनी अप्रत्यक्ष सरकारला जोरदार टोला  हाणला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलंय’

कोरोनामुळे  आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर उपाययोजना जाहीर केल्या. यूएस – ८५० अब्ज डॉलरचे आर्थिक पॅकेज, यूके –  ३३० अब्ज पौंड, जर्मनी – ५०० अब्ज युरो, इटली – २५  अब्ज युरो, भारत – बेल/घंटी. (स्रोत – रॉयटर्स, बीबीसी आणि फायनान्शियल टाइम्स) तसेच भारतीय अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी भारत सरकारने जलद गतीने कार्य केले पाहिजे! असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!