🕒 1 min read
मुंबई : 2020 मावळत आहे. मावळते वर्ष काहीच चांगले पेरून गेले नाही. त्यामुळे नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. नवं वर्ष अगदी धूमधडाक्यात साजरं होणार नसलं तरीही येणाऱ्या वर्षाकडून खूप अपेक्षा आहेत. या परिस्थिती मध्ये कलाकारांनी देखील न्यू इअर प्लॅन्समध्ये बदल केल्याचं दिसत आहे.
न्यू इअर सेलिब्रेशसाठी बॉलीवूड मधील सगळे सेलेब्रिटी परदेशात जात होते मात्र कोरोनाच्या गंभीर परिस्थतीत मध्ये बॉलीवूड कलाकारांनी यंदा भारतातच सेलिब्रेशन करण्यास प्राधान्य दिल्याचं दिसून येतंय. इतकंच नाही तर बॉलिवूडमधला सुपस्टार नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थेट कोकणांत पोहोचला आहे.
‘येवा, कोकण आपलाच असा’… अशा कोकणवासीयांच्या आवतणाला आमिर खाननं देखील प्रतिसाद दिलाय . कोकणातील समुद्र किनारे, नारळ-पोफळीच्या बागा, सर्वत्र पसरलेली हिरवाई अनुभवण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तो कुटुंबियांसह हेलिकॉप्टरनं काल संध्याकाळी म्हणजेच मंगळवारी सिंधुदुर्गात दाखल झाला आहे. अमीर खान सह बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटी भारताच न्यू इयर साजरी करत असल्याचं दसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- धोका पुन्हा वाढला : 2 वर्षांच्या चिमुकलीमध्येही आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
- महाआघाडी सरकारने महिलांच्या विषयात तरी राजकारण करू नये- भाजपा
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- आंदोलक शेतकऱ्यांशी आज चर्चेची सातवी फेरी; कृषी कायद्यांच्या तोडग्याकडे सर्वांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
