Share

NCP on Santosh Bangar | अरेरावी करणाऱ्यांना मुख्यमंत्री महोदय कसे वेसण घालणार? ; राष्ट्रवादीचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

NCP on Santosh Bangar | मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, असा इशारा बांगर यांनी दिला. कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कृषी पंपांच्या थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे संतोष बांगर संतापले आणि त्यांनी दमदाटी केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने यावर टीका केली असून आक्षेप घेतला आहे.

“कधी मध्यान्ह भोजन केंद्रातील व्यवस्थापकाच्या कानशिलात लगवायची तर कधी पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालायची. वाद घालण्यात पटाईत असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आता थेट महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. वीज कनेक्शन कट केल्याने ते कर्मचाऱ्यांना रट्टे देण्याची भाषा वापरत आहे. सत्तेचा गैरवापर करत अशा प्रकारचे सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे कितपत योग्य आहे? ही कोणती वागण्याची पद्धत? अशी अरेरावी करणाऱ्यांना मुख्यमंत्री महोदय कसे वेसण घालणार?”, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उपस्थित केला आहे.

संतोष बांगर यांची ओळख आक्रमक आमदार म्हणून आहे. यापूर्वी त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या एका हॉटेलची पाहणी करत असताना अन्नाचा निकृष्ट दर्जा पाहून बांगर चांगलेच संतापले आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावल्या होत्या.

कारवाईची मागणी-

संतोष बांगर यांनी या उपहारगृहाच्या किचनची पाहणी केली असता बराच भाजीपाला हा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचपासून पुढे अन्न तयार करून ते लोकांना पोहचवले जात होते. तसेच शासनाने सांगितलेल्या पदार्थांपैकी कोणताच पदार्थ दिला जात नव्हते. रोज एकसारखेच अन्न दिले जात आहे. त्यामुळेच संबंधित कंत्राटदाराची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी बांगर यांनी जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!