Share

Baba Ramdev | “महिलांनी काही नाही घातलं तरी…” ; रामदेव बाबांची जीभ घसरली

Published On: 

🕒 1 min read

Baba Ramdev | ठाणे : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यात रान पेटलेलं असताना आता यात आणखी एक भर पडली आहे. योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, तसेच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांची प्रकरणं ताजी असतानाच रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ठाण्यातील योगा कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी रामदेव बाबा म्हणाले की,महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात.”

योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलनासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाब बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. दरम्यान या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अमृता फडणवीस (Amruta Fadanvis), शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!