🕒 1 min read
हिंगोली : परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचा सर्व पिकाचे मोठे नुकसान झाले आहे यातच बँकांत तर्फे पीक कर्ज वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात अनेकांना नोटीसही बजावण्यात आले असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. त्यामुळे वसुलीसाठी नोटीस पाठवाल तर याद राखा तुम्हाला महागात पडेल असा इशारा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी बँकांना दिला आहे.
जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुग, उडीद, सोयाबिनचा हाती आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. सोयाबिनच्या पिकाला कोंबे फुटली आहेत. तर कापसाची पहिली वेचणीही झाली नाही. पहिल्या वेचणीचा कापूस पावसाने कोंब फुटले आहेत. तर उर्वरीत बोंडे सडून गेली आहे. तुरीच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या परिस्थितीत आता बँकांककडून पिककर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावल्या जात आहे. काही बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीस देखील पाठविल्याच्या तक्रारी आहेत. या बाबत प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे आमदार बांगर चांगलेच संतापले.
शेतकऱ्यांना नोटीस पाठवाल तर महागात पडेल.नोटिसा पाठवल्यासबँकेसमोर शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशाराही आमदार बांगर यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191666268773838849?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191665922341134337?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
