टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात भाजपबरोबर युती असली तरी शिवसेना गोव्या मधून भाजप विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत आज पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात जरी एकत्र येवून निवडणूक लढवत असले तरी गोव्यात मात्र विरोधक असणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून उत्तर गोव्यातून राज्यप्रमुख जितेश कामत तर दक्षिण गोव्यातून उपराज्यप्रमुख राखी प्रभुदेसाई नाईक निवडणूक लढवणार आहेत. तसेच गोव्यात विधानसभेच्या तीन जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना मांद्रे विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी शिवसेना लवकरच उमेदवार देखील जाहीर करणार आहे. असे देखील राऊत म्हणाले.
दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेनेने सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचसोबत युती केली होती. यावेळी गोवा सुरक्षा मंचने तिन्ही पोटनिवडणुकांचे उमेदवार जाहीर केले आहेत. असे असले तरीआज किंवा उद्या वेलिंगकर यांच्याशी चर्चा करून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

