Share

संजय राऊत म्हणतात…किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या समाजकंटक जमावाने पोलिसांसह सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचा सपाटा लावला आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक हिंसक आदोलन पसरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. अनेक शहरांमध्ये हिंसा भडकली आहे.

एका बाजूला उग्र निदर्शने सुरु असताना शिवसेनेचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. ‘सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में| किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है’, अशा ओळी राऊतांनी या ट्विटमध्ये लिहल्या आहेत. त्यांच्या या ट्विटचा रोख केंद्र सरकार राबवू पाहत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दिशेने असल्याचा अंदाज आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1208577218210779136?s=20

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींवेळीही संजय राऊत सातत्याने सूचक ट्विटस करून शिवसेनेची भूमिका मांडत होते. त्यामुळे राऊत यांचे हे ट्विट पाहून शिवसेना नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काही निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे का, याविषयी अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

तर दुसऱ्या बाजूला नागरिक नोंदणी कायदा आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नागरिकांनी आपल्या घराबाहेर तिरंगा फडकावून निषेध व्यक्त करावा, असं आवाहन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. ते हैदराबाद येथे बोलत होते.

https://twitter.com/ANI/status/1208494512399474693?s=20

भाजप सरकारने आणलेला कायदा घटनाविरोधी आहे. या कायद्याच्या विरोधात लोकांनी आपला आवाज उठवायला हवा. लोकांनी याविरोधात आपल्या घराबाहेर झेंडा फडकवावा म्हणजे हा कायदा चुकीचा असल्याचा संदेश भाजपला जाईल, असंही ओवैसी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1208651700640174080?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1208649507354771458?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!