टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असं सेना नेते संजय राउत यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं. सरकार स्थापनेबाबत भाजपा-सेना दरम्यान अद्याप कोणतीही बोलणी झालेली नाहीत असं ते म्हणाले.
सरकार निर्मितीबाबत भाजपाला कोणताही निर्वाणीचा इशारा दिलेला नाही, शिवसेनेनं ठरवलं तर सरकार स्थापनेसाठी ते आवश्यक संख्याबळ जुळवू शकतात असा दावाही राऊत यांनी केला. मुख्यमंत्री पद प्रत्येकी अडीचवर्षे ठेवणे आणि प्रत्येकी 50 टक्के खातेवाटप करण्याची सेनेची मागणी भाजपाने यापूर्वीच फेटाळून लावली आहे.
संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात गुरुवारी झालेल्या भेटीने राजकीय आणि पत्रकारांच्या वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यासंदर्भातही राऊत यांनी आज उत्तर दिलं. शरद पवार यांना मी अधूनमधून भेटतो. ते नवीन नाही त्यावर अनेकदा टीका होते. पण ते या देशाचे अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. अनेक दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यांना भेटल्यावर अनेक गोष्टी शिकता येतात, समजून घेता येतात. राजकारणाविषयी, कृषीसंदर्भात शिकता येतं, असं सांगतानाच माझी ही सदिच्छा भेट होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण सध्याचं राजकारण पाहता तुम्हाला जर शंका येत असतील तर त्या शंकांचं मी निरसन करणार नाही असंही ते म्हणाले.
‘ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी भलतं धाडस करून नये, असं विधान केले आहे. तसेच पुढे बोलताना शिवसेनेने जर ठरवलं तर बहुमत सिद्ध करू शकते असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190169491864375296?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190171180004544512?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

