Eknath Shinde । नवी दिल्ली : काल लोकसभेतील शिवसेनेच्या १९ पैकी किमान १२ खासदारांनी स्वतंत्र गट तयार करण्याचीमागणी केली आहे. या संदर्भात खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र दिल आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (शिवसेना) हा मोठा झटका मानल्या जात आहे. तसेच कालच शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तसा फोटो समोर आला आहे. यानंतर शिंदे गट आता आपणच खरी शिवसेना असल्याचा प्रबळ दावा करण्याच्या तयारीत आहेत. यानंतर आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच शिंदे गटातील नेते उद्या शिवसेना भवनावरही ते दावा ठोकू शकतील,अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. यावरून संजय राऊत यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. फुटीर गटाचं काय सांगता, ते चंद्रावरही कार्यलय स्थापन करतील, शिवसेना भवनच काय सामना आणि मातोश्रीचाही ताबा मागतील. अशा प्रकारे एक दिवस ते जो बायडनचं घरही ताब्यात घेतील. 10 डाऊनिंग स्ट्रीटला जातील. तिथेही ताबा घेतील. एवढा मोठा पक्ष आहे त्यांचा… बाळासाहेब ठाकरेंचा मुळ पक्ष आमचाच आहे, असंही म्हणतील, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर लागलीच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचा विश्वासही या खासदारांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात 12 खासदारांनी पत्र लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिले आहे. यावेळी त्यांनी अध्यक्षांना तीन प्रमुख मागण्या केल्या. यामध्ये राहुल शेवाळे यांना लोकसभेचे गटनेते करा, संसद भवनामध्ये नवीन कक्ष कार्यालय या गटाला द्यावे तसेच पक्षप्रतोद म्हणून भावना गवळी यांच्या नावाचे पत्र दिले आहे. त्यालाही लोकसभा अध्यक्षांनी मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shinde Vs Thackeray : “…व्यक्तीला मुख्यमंत्रीपद बहाल करावं या कल्पनेत आपण आहोत का?”, शिंदे गटाची कोर्टात विचारणा
- Sanjay Raut -“हे तर जो बायडेनचं घरही ताब्यात घेतील” ; एकनाथ शिंदे गटावर संजय राऊतांची टोलेबाजी
- Sanjay Jadhav | “लोभाला मर्यादा असावी” ; शिवसेना खासदार संजय जाधव यांचा शिंदे गटावर निशाणा
- AIMIM : गुगल मॅपकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख; एमआयएम तक्रार दाखल करण्याची शक्यता
- Shinde Vs Thackeray : शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

