Share

भाजपवर दबाव वाढला, आज संजय राऊत घेणार राज्यपालांची भेट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे तर भाजप समसमान वाटप करण्यास तयार नाही. दोनही पक्षाचे नेते यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. राज्य पातळीवर हा तिढा काय मिटणार नाही असं सध्याचे चित्र आहे. अशातच खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत सत्तासंघर्ष तीव्र झालेला दिसत आहे.

शिवसेनेची भूमिका मांडणारे खासदार संजय राऊत आज (सोमवारी) राज्यपालांची भेट घेणार आहेत. सायंकाळी पाच वाजता ते राज्यपालांना भेटतील. खासदार राऊत हे सत्तास्थापनेचा दावा करणार नाहीत. मात्र घटनेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण द्या अशी मागणी ते राज्यपालांकडे करणार आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रीयेला सुरुवात करावी या मागणीसाठी राज्यापालांशी ते भेटणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे संजय राऊत यांनी सांगितल आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून भाजपवर तोफ डागण्यात येत आहे. या सर्वांची जबाबदारी संजय राऊत सांभाळत आहेत. त्यांच्या अनेक वक्तव्यांनी राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे. राऊत दररोज नवनवीन दावे करत असल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे. शिवसेनेकडे 170 आमदारांच बहुमत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल असे वक्तव्य त्यांनी रविवारी केले. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेणे अत्यंत महत्त्वाचं मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191209060902699009?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191207045933854720?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191202498398187520?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191200745330073600?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!