टीम महाराष्ट्र देशा : भाजप – शिवसेना युती झाल्याने दोन्ही पक्षातील अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली होती. मात्र भाजप नेत्यांनी चर्चा करून अनेक बंड थंड केले होते. मात्र अजूनही काही मतदारसंघांमध्ये बंडखोरांची बंडाळी कायम आहे. जे बंडखोर उमेदवार ऐकत नाहीत अशांवर भाजपने कारवाई केली आहे. मात्र शिवसेनेच्या विरोधात उभे राहिलेल्या भाजप उमेदवारांवर भाजपने अजूनही कारवाई झाली नसल्याची तक्रार शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केली आहे.
तुमसरचे बंडखोर उमेदवार चरण वाघमारे, मीरा भाईंदरच्या गीता जैन, चिंचवडमधून बंडखोरी केलेले बाळासाहेब ओव्हाळ आणि लातूरच्या अहमदपूरचे दिलीप देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून बडतर्फ केले. तर बंडखोरी केलेले पालघर जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी आपणहून राजीनामा दिला.
मात्र, भाजपने शिवसेना उमेदवाराविरोधात रणशिंग फुंकलेल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपाचा हाच युतीधर्म आहे का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आणि मित्रपक्ष युती करून लढत आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात बंडखोरी होत आहे. असेच चित्र कॉंग्रेस आघाडीतही पाहिला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182588972431626240?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182588054705340416?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182587858919419904?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

