Share

उद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा : खा. संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला दिली भेट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी तेथील पाहणी करण्याकरता दाखल झालेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला भेट दिली.

यावेळी पत्रकारांसोबत बोलताना ‘राम मंदिराचा मुद्दा न्यायालयाचा विषय नसून तो आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. भाजपने लोकसभा निवडणूक 2019 आधी राम मंदिर निर्माणासाठी संसदेत अध्यादेश आणावा. नाही तर जनताच भाजपला वनवासात पाठवेल’, असा थेट  इशारा संजय राऊत यांनी दिला.

‘मी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित यात्रेच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. राममंदिर निर्माणाच्या दिशेनं आपण आणखी एक पाऊल पुढे कसे जाऊ शकतो त्याच प्रयत्नात इथे आलो आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी भगवान श्री रामचंद्रांचं दर्शन करतील’, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

२०१९ पूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करू-अमित शहा

या भेटीमागे दडलंय काय ? जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!