Share

गळ्यात घड्याळ, हातात कमळ; संजय रावतांनी ट्वीट केलेल्या व्यंगचित्रामुळे चर्चेना उधाण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :- राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजप शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. परंतु दोन्ही पक्षांनी मागील वेळेपेक्षा कमी जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये ’50-50′ या सूत्रावरून मंथन सुरू आहे आणि त्यादरम्यान शुक्रवारी सकाळी शिवसेनेचे संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे.

ज्यामध्ये वाघाच्या हातात कमळाचे फूल दर्शवले गेले आहे. खास गोष्ट म्हणजे या वाघाच्या गळ्यात घड्याळ आहे. हे व्यंगचित्र शेअर करत संजय राऊत यांनी कॅप्शन लिहिले आहे, ‘व्यंग चित्रकाराची कमाल! बुरा न मानो दिवाली है…’

या चित्रानुसार हा शिवसेनेचा वाघ असून त्याच्या गळ्यातील घड्याळ राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह आहे. तर कमळ हे भाजपाचे चिन्ह आहे. म्हणजेच या व्यंगचित्रातून शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असून त्यांच्या हातात कमळाचे फूल असल्याचे थेट संदेश देऊ इच्छित आहेत. म्हणजेच जर भाजपशी चर्चा झाली नाही, तर त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबादेखील आहे.

दरम्यान, भाजपाला मुख्यमंत्री बसवायचा असेल तर शिवसेनेशी वाटाघाटी कराव्याच लागतील नाहीतर आमच्याकडे पर्याय खुला आहे असाच या ट्विटचा अर्थ आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात महाराष्ट्रात शिवसेना काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1187688497643057153?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187687915666591744?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!