Share

‘भाजपला भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा’

Published On: 

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा, त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशा जळजळीत शब्दांत मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केलं.

शुद्ध भगवा कोणाचा यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं आहे. “आमचा भगवा शुद्ध आहे. महाराष्ट्रातील जनतेला आमच्या भगव्याची माहिती आहे. कोणीही आमच्या भगव्याविषयी बोलू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे. हात लावाल, तर राख व्हाल” असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

तर, “भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा. भगवा फडकवायचा असेल तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा. आमचं हिंदुत्वसुद्धा आहे. कोणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. वेळ आल्यास आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका मांडू. मेहबूबा मुफ्तींसोबत सरकार स्थापन करणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये”, असा घणाघाटी आव्हान देखील संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!