मुंबई : एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला त्यांनी धक्के देण्यास सुरुवात केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची वाट धरली होती.
खडसे यांच्या पक्षांतरानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार होते. मात्र, शरद पवारांना हा दौरा रद्द करावा लागला होता. एकनाथ खडसे क्वारंटाईन असल्याने खबरदारी म्हणून हा दौरा रद्द केला होता. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती.
यानंतर, कालच आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. कोणतेही लक्षणं दिसत नसून पुढील उपचारासाठी मुंबईला जाणार असल्याचं देखील स्पष्ट केलं होतं. मात्र, आता त्यांचे कोरोना रिपोर्ट नेगेटिव्हआले आहेत. उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले असता त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कनाथ खडसे यांचे मुंबईत आल्यानंतर दोन्हीही रिपोर्ट नेगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सकाळी 10 वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर : मनपाच्या २९ शाळा / कनिष्ठ महाविद्यालय २३ नोव्हेंबर पासून सुरु होणार
- मर्यादित संख्येत कार्तिकी यात्रेची परंपरा जोपासावी : आचार्य तुषार भोसले
- मतदार यादीतील नाव, पत्ता दुरुस्ती करण्याची संधी मिळणार
- राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार!
- खडसेंपाठोपाठ भाजपचा दिग्गज नेता कोरोनाच्या विळख्यात!


