कराड : राज्यात मागील वर्षी ऐनवेळी राजकीय गणित बदलल्यामुळे झालेलं सत्तांतर पाहायला मिळालं. भाजप-शिवसेनेच्या महायुतीला २०१९ निवडणुकांमध्ये बहुमत मिळालं. मात्र, काही मतभेदांमुळे शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि विरोधी विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली.
या सरकारवर गेल्या वर्षभरात भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुरु ठेवलं असून हे सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत वर्तवलं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ‘सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं.’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
यासोबतच, ‘कार्यकर्तेबरोबर राहण्याकरिता आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये, यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं’ असा खोचक चिमटा देखील त्यांनी भाजप नेत्यांना काढला आहे. तर, ‘आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगू शकतो,’ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन
- अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात
- ‘वीजबिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी केंद्र सरकारच्या लुटमारीविरोधात आंदोलन करावे’
- राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का ? राजेश टोपे म्हणाले…
- पुत्रांच्या चौकशीनंतर आता प्रताप सरनाईकांना ईडीने धाडलं बोलावणं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

