मुंबई : बुधवारी(१ डिसें.)मुंबईत माध्यमांशी संवाद साधत असतांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banrjee) यांनी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करत भाजपा आणि काँग्रेस अशी लढत होते त्याच राज्यांमध्ये भाजपा वाढत असल्याचे सांगत काँग्रेसवर टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, ममतांच्या या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात बोलत असतांना राऊत म्हणाले की,’जसं युपीए अस्तित्वात नाही म्हणतात तसंच एनडीएही अस्तित्वात नाही. एनडीए कुठे आहे? शिवसेना, अकाली दल बाहेर पडले असून इतर पक्षही बाहेर पडत आहेत. एकेकाळी आम्ही एनडीएत होतो. युपीए मजबूत करण्याची गरज आहे हे सत्य.’ तसेच पुढे काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात असतात या ममतांच्या टीकेविषयी बोलत राऊत म्हणाले की,’राहुल गांधी(Rahul Gandhi) परदेशात आहेत की नाही माहिती नाही. फक्त कोरोनामुळे पंतप्रधान परदेशात नाहीत इतकंच आहे. ते सुद्दा परदेशात असतात. त्यावर कोणी टिका-टिप्पणी कोणी करु नये’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, नागरी समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधत असतांना ममता यांनी देशातील समविचार पक्ष एकत्र येणे ही काळाची गरज आहे. भाजपच्या पराभवासाठी समविचार पक्षांच्या मतांचे विभाजन टाळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच भाजपच्या विरोधात लढण्यासाठी विरोधी पक्षांना दिशा देण्याच्या उद्देशाने नागरी समाजासह समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेले मार्गदर्शक मंडळ स्थापन करण्याची सूचना आपण काँग्रेसला केली होती, पण काँग्रेसने ही सूचना गांभीर्याने घेतली नाही, असेही यावेळी ममता म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- एसटी महामंडळाचा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू
- सरकारचे ‘हे’ निर्बंध केंद्रीय आरोग्य विभागाने देशभरासाठी लागू केलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारे
- गुलाम नबी आझाद यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले,’२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला…’
- भारतात ओमायक्रॉन आढळल्यास आश्चर्य वाटणार नाही- डॉ. समीरन पांडा
- …यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत का?- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

