Share

गिरीश कुबर यांच्यावर भर संमेलनात शाई फेक

Published On: 

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. समारोपाच्या कार्यक्राच्या आधीच एक धक्कादायक घटना घडली आहे. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला आज या घटनेने गालबोट लागले आहे.

लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक आणि ज्येष्ठ लेखक गिरीश कुबेर यांच्यावर भर संमेलनामध्ये शाई फेकण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी शाई फेकल्याची माहिती मिळाली आहे. साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूलाच ही शाईफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी शाई फेकणाऱ्या काही लोकांना ताब्यातही घेतलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वारंवार अग्रलेख लिहल्यामुळे शाई फेकली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त असतानाही ही शाई फेकण्याची घटना घडली आहे. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी संभाजी महाजारांबाबत चूकीचं लिखाण केल्यामुळे गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकली असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!