Share

मोदींच्या ५ एप्रिलच्या आवाहनावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – आज लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले आहे.

यासोबतच, येत्या रविवारी ५ एप्रिलला जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावं म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संजय राऊत यांची टीका –

जनता कर्फ्यूच्या दिवशी थाळीनाद करण्याच्या वेळी काही अतिउत्साही लोकांनी गर्दी करून मूळ उद्देशालाच हरताळ फसली होती. त्यावरून सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सर्व प्रकारावर अग्रलेखातून मोदींवर टीका केली होती.

आता आजही संजय राऊत यांनी मोदींच्या दीप, मेणबत्ती लावावे या आवाहनावर टीका केली आहे. मोदींनी कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोलाव  तसेच अतिउत्साही लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं असा टोलाही लगावला आहे. ते म्हणाले,

‘टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झालं. साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोलां.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!