मुंबई : खासदार संजय राऊत यांनी एका चॅनेलवरील मुलाखतीत उद्धव ठाकरेंच्या मेडिकल क्षेत्रातील ज्ञानावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंचे मेडिकल क्षेत्रातील ज्ञान अफाट असल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेतील डॉक्टरांना काय कळत, अस विधान केलं आहे. त्यांच्या या वक्त्यावावरून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला महाविकास आघाडीतील नेते समर्थन देत आहेत. राज्याचे गृहनिर्माणमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील एका ट्विटद्वारे जागितक आरोग्य संघटनेविरोधात अमेरिकेसह तज्ञ डॉक्टर्स आणि इतर राष्ट्रांनी केलेल्या कारवाईचा उल्लेख करत संजय राऊत यांनी WHO संदर्भात केलेल्या विधानाची पाठराखण केली आहे.
भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्षपदी ‘या’ दमदार युवा नेत्याची निवड
जितेंद्र आव्हाड यांनी, ‘ जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेने प्रश्नचिन्ह निर्माण केले संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात-डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. ह्या विषयावर कोणीही बोलताना दिसलेले नाही.संजय राऊत बोलले आणि वादळच आले,’ असे ट्विट करत गेले काही दिवस निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेने प्रश्नचिन्ह निर्माण केले संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात-डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. ह्या विषयावर कोणिही बोलताना दिसलेले नाही.@rautsanjay61 बोलले आणि वादळच आले
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 17, 2020
स्वरमार्तंड! पंडित जसराज यांचे निधन;भारतीय संगीतातलं विद्यापीठ हरवल्याची भावना
दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राजकारण करण्यासाठी विपर्यास केला जात असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर लावत राऊतांचे समर्थन केले. त्यांनी, “शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून काही लोक राजकारण करण्याचा हीन प्रकार करत आहेत … कोरोना महामारी रोखण्यासाठी लढणारे सर्व डॉक्टर्स आमच्यासाठी देव-देवता प्रमाणे आहेत.”, असे ट्विट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढचा महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी गंभीर आहे – देवेंद्र फडणवीस
संजय राऊत यांनी कोणतं विधान केलं होतं?
‘WHO ला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नही. कंपाऊंडरकडून घेतो. कारण त्यांना जास्त कळतं.’ असे विधान केलं होतं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

