नवी दिल्ली- भारतीय संगीत जगताचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे निधन झाले. संगीत साधक पंडित जसराज यांची संगीत जगतात जवळजवळ 80 वर्षाची कारकीर्द आहे. त्यांना देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना संगीत रसिकांच्या मनात आहे.
२८ जानेवारी १९३० मध्ये जन्मलेल्या पंडित जसराज यांना संगीताचा वारसा लाभला होता. त्यांचा जन्मच अशा कुटुंबात झाला ज्याच्या चार पिढ्या संगीत साधनेत होत्या. वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ पंडित मणिराम यांनीच जसराज यांचा सांभाळ केला होता. हरियाणातील हिसार येथील जसराज यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या मुलीशी मधुरा शांताराम यांच्याशी विवाह केला होता.
पंडित जसराज यांनी शिष्योत्तमांची एक मोठी परंपरा निर्माण केली. त्यात अनेक नामवंत शास्त्रीय गायकांचा समावेश आहे. सप्तर्षी चक्रवर्ती, संजीव अभ्यंकर, कला रामनाथन, तृप्ती मुखर्जी, सुमन घोष, शशांक सुब्रह्मण्यम, अनुराधा पौडवाल, साधना सरगम आणि रमेश नारायणन्आदींचा त्यात समावेश आहे. ऍटलांटा, टम्पा, व्हॅनकोव्हर, टोरॅंटो, न्यूयॉर्क, न्यू जर्सी, पिटसबर्ग आणि मुंबईत त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शिकवणारी विद्यालये सुरू केली. वयाच्या नव्वदीतही ते शिष्यांना स्काईपवरून मार्गदर्शन करत असत.
महत्वाच्या बातम्या –
राजेश टोपेंची शरद पवारांना सध्या राज्यात न फिरण्याची विनंती
लवकर बरे व्हा, रोहित पवारांच्या निलेश राणेंना सदिच्छा
फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही – राजू शेट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

