पुणे : भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या पदांसाठीच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपाची युवक आघाडी असलेल्या भाजपा युवा मोर्चाच्या देखील पुणे जिल्ह्यातील पदांसाठीच्या निवड घोषित केल्या गेल्या आहेत. युवा नेतृत्वाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या जबाबदारीसाठी अनेक इच्छुक असतात. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
किरण दगडे पाटील हे पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड-बावधन भागाचे नगरसेवक आहेत. यासोबतच ते पुणे महानगरपालिकेच्या बी.डी. पी समितीचे अध्यक्ष देखील आहेत. भागातील काम, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेला जनसंपर्क आणि युवकांची असलेला पाठींबा यामुळे किरण दगडे पाटील यांची थेट भाजयुमो जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे सांगितले जात आहे.
पुढचा महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी गंभीर आहे – देवेंद्र फडणवीस
प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटाचे ते निर्माते देखील आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीला पुणे जिल्ह्यात कडवे आव्हान देण्यासाठी भाजपातर्फे या पदासाठी दमदार युवा नेतृत्वाची शोध घेतला जात होता. भाजयुमोसोबतच भाजपाच्या पुणे शहर व जिल्ह्यातील संगठनामध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.
…तरच धार्मिक स्थळं सुरू होऊ शकतात, राजेश टोपेंचे स्पष्टीकरण


